महाराष्ट्र

maharashtra

अंबाबाई दर्शन संख्या वाढवली; आता तासाला 1 हजारांहून अधिक भाविकांना दर्शन

By

Published : Oct 9, 2021, 11:05 AM IST

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई पास धारकांनाच अंबाबाईचे दर्शन घेता येत आहे. तासाला केवळ 700 भक्तांना मंदिरात दर्शनासाठी सोडले जात होते. यामध्ये आता वाढ करून ही संख्या 1 हजारावर नेली आहे. ई पास काढणे आणि त्याद्वारे दर्शन अगदी कमी वेळेत होत असल्याने भाविकांचा सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अंबाबाई दर्शन
अंबाबाई दर्शन

कोल्हापूर - 7 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त करवीर निवसानी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातील भाविक येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई पास धारकांनाच अंबाबाईचे दर्शन घेता येत आहे. तासाला केवळ 700 भक्तांना मंदिरात दर्शनासाठी सोडले जात होते. यामध्ये आता वाढ करून ही संख्या 1 हजारावर नेली आहे. ई पास काढणे आणि त्याद्वारे दर्शन अगदी कमी वेळेत होत असल्याने भाविकांचा सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. दर्शन सुद्धा जलद जप्त असल्याने देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे.

आता तासाला 1 हजारांहून अधिक भाविकांना दर्शन

भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर दर्शन संख्या आणखी वाढवू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे मंदिरामध्ये दर्शन घेताना गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून नेटके नियोजन करण्यात आले आहे. दर्शन रांग सुद्धा मोठी बनविण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी न होता भाविक अगदी 10 मिनिटांत आई अंबाबाईचे दर्शन घेऊ शकत आहेत. त्यामुळे तासाला 700 भाविक दर्शन घेत होते त्यामध्ये वाढ करून आता 1 हजार इतकी संख्या करण्यात आली आहे. काल 8 ऑक्टोबर रोजी 900 भक्तांना दर्शन देण्यात आले त्यामध्ये सुद्धा कोणताही अडथळा आला नसल्याने ही संख्या वाढविण्यात आली आहे. आज सुद्धा व्यवस्थित दर्शन घेता आले तर यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार असल्याची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना माहिती दिली.

अंबाबाई दर्शन

ABOUT THE AUTHOR

...view details