महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मला सीमेवर लढण्याची परवानगी द्या; ७५ वर्षीय माजी सैनिकांची पत्राद्वारे मागणी - कागल

माजी सैनिक गजानन दत्तात्रय पाटील

By

Published : Mar 2, 2019, 7:55 PM IST

कोल्हापूर - पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून मिटवले पाहिजे. जोपर्यंत त्यांना धडा शिकवणार नाही, तोपर्यंत समाधान मिळणार नाही. त्यामुळे मला सीमेवर लढण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारे पत्र एका ७५ वर्षीय माजी सैनिकांनी लिहिले आहे. या माजी सैनिकांचे नाव आहे गजानन दत्तात्रय पाटील. ते कागल तालुक्यातील यमगे गावचे रहिवासी आहेत.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली आहे. अशातच गजानन पाटील यांनी पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशातून मिटवले पाहिजे, अशी संतप्त मागणी केली आहे. पाटील एव्हढ्यावरच थांबले नाहीत, तर भारत पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे आम्हाला येथे झोप लागत नाही. त्यामुळे आम्हाला सीमेवर लढण्याची परवानगी द्या. माझ्यासोबत कागल तालुक्यातील शेंदुर गावचे माजी सैनिक तुकाराम शेवाळे हेदेखील यायला तयार आहेत, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली.

पाटील यांनी जिल्हा सैनिक कल्याण मंडळाकडे हे मागणीचे पत्र पाठवले आहे. विशेष म्हणजे या पत्राच्या शेवटी आम्ही आपल्या ऑर्डरची वाट पाहत आहोत, असाही उल्लेख केला आहे. या वयातही त्यांचा पाकिस्तान विरोधात लढण्याचा जोश आणि राष्ट्राप्रती असलेले प्रेम प्रकट होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details