कोल्हापूर -रविवारपासून सर्वत्र शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा होतो. अंबाबाई मंदिर परिसरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
एक आठवडा आधीपासूनच मंदिर परिसरात उत्सवाची तयारी सुरू झाली होती. दरवर्षी नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरात मंडप घालण्यात आले आहेत.