महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात - शारदीय नवरात्र उत्सव कोल्हपूर

कोल्हापुरात शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मागील ३ ते ४ दिवसांपासून मंदिरात स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

मंदिर परिसरात सफाई करताना कर्मचारी

By

Published : Sep 25, 2019, 7:27 PM IST

कोल्हापूर - शारदीय नवरात्र उत्सवाची 29 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात दरवर्षी मोठ्या नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो.

कोल्हापुरात शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे


उत्सवासाठी एक आठवडा अगोदरच मंदिर परिसरात तयारीला सुरुवात झाली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून मंदिरात स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

हेही वाचा - ऐकावे ते नवलच...एकाच वेळी दोन पक्षातून उमेदवारी

दरवर्षी नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरात मंडप घालण्यात आले आहेत. भाविकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची सुद्धा तयारी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. सध्या अंबाबाईच्या दागिन्यांच्या स्वच्छतेचे काम सुद्धा सुरू असून उद्यापर्यंत उत्सवाची तयारी पूर्ण होणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details