महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MPSC Result : सासरच्या पाठिंब्याने तिसऱ्यांदा एमपीएससी परीक्षेत यश, ऐश्वर्या नाईक-डुबल यांची महापालिका मुख्याधिकारीपदी निवड - Aishwarya Naik Dobal elected

एमपीएसीच्या माध्यमातून ऐश्वर्या नाईक डुबल यांची महापालिका आयुक्तपदी निवड झाली आहे. काल जाहीर झालेल्या 2021 च्या राज्य सेवा परीक्षा म्हणजे MPSC च्या अंतिम निकालात ऐश्वर्या जयसिंग नाईक-डुबल यांनी बाजी मारली आहे. त्या रा. हळदी, ता. करवीरच्या रहिवाशी आहेत.

Aishwarya Naik Dobal
Aishwarya Naik Dobal

By

Published : May 27, 2023, 6:49 PM IST

Updated : May 27, 2023, 7:12 PM IST

ऐश्वर्या नाईक-डोबाल यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर : अनेकवेळा हुशार मुली लग्न झालं की संसाराच्या गाडीत बसतात. आपलं अस्तित्व आणि स्वप्न विसरून जातात. मात्र संसार सांभाळत सातत्य कष्ट आणि माहेरच्या बरोबरच सासरचा पाठिंबा मिळाला, तर मुलगी काय करू शकते. हे करवीर तालुक्यातील हळदी गावातील ऐश्वर्या नाईक डूबल यांनी दाखवून दिले आहे. कालच दि. 25 रोजी जाहीर झालेल्या 2021 च्या राज्य सेवा परीक्षा म्हणजे MPSC च्या अंतिम निकालात ऐश्वर्या जयसिंग नाईक-डुबल रा. हळदी, ता. करवीर, सध्या रा. कराड हिची नगरपालिका मुख्याधिकारीपदी निवड झाली आहे.


ऐश्वर्या उत्कृष्ट खेळाडू : ऐश्वर्या करवीर तालुक्यातील हळदी गावातली मुलगी. मात्र, सध्या ती नोकरी निमित्त सांगली येथे वास्तव्यास आहे. ऐश्वर्याचे वडील क्रीडा संचालक आहेत. तर आई गृहिणी आहे. यामुळे लहानपणापासूनच तिच्या घरात खेळाचे वातावरण असल्याने ती एक राष्ट्रीय पातळीवर खेळणारी उत्कृष्ट अ‍ॅथलेटिक्स, स्विमिंगमधील खेळाडू आहे. ऐश्वर्याने आपले प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत पुर्ण केल. पुढे कोल्हापूरातील पद्माराजे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन न्यू कॉलेजमधून पदवी मिळविली. लहानपणापासूनच शालेय जीवनात ती हुशार होती शिवाय उत्कृष्ट खेळाडू देखील होती.


नगरपालिका मुख्याधिकारीपदी पोहोचण्यासाठी मी केलेले कष्ट आणि घरच्यांचा मिळालेला पाठिंबा यामुळे मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले याचा मला आनंद आहे या पदाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची मला संधी मिळेल. मला डीवायएसपी व्हायची इच्छा होती मात्र एवढ्या जागा उपलब्ध नसल्याने मी या पदाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. - ऐश्वर्या नाईक-डुबल

पदवी घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी :ऐश्वर्याच्या वडिलांची आपली मुलगी सेट परीक्षा द्यावी, अशी इच्छा होती. मात्र, ऐश्वर्याने आपल्याला प्रशासकीय सेवेमध्ये जायचे आहे, हे निश्चित केलं होत. यामुळे पदवी घेत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेसाठी तयारी सुरू केली होती. मात्र कोरोना काळात परिक्षांना विलंब झाला. यामुळे मधल्या काळात तिने अर्थशास्त्र विषयातून ती सेट परिक्षा पास झाली. तर MPSC परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात ऐश्वर्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकपदी निवड झाली, तर दुसऱ्या प्रयत्नात उप-अधिक्षक भूमिअभिलेख अधिकारीपदी निवड झाली. या पदावर त्या सध्या सांगली येथे कार्यरत आहेत.

सासर आणि माहेरच्या लोकांचाही पाठिंबा :ऐश्वर्याचे लग्न झाल्याने काम आणि संसार सांभाळत तिने आपला अभ्यास सुरूच ठेवला होता. सातत्य आणि कष्ट याला माहेर आणि सासरच्या लोकांची तिला जोड मिळाली. अखेर काल जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेच्या अंतिम निकालात तिला यश मिळाले. नगरपालिका मुख्याधिकारीपदी तीची निवड झाली. ऐश्वर्याच्या बाहेरचे जितके शिक्षित आहेत तितकेच सासरचे देखील आहेत. ऐश्वर्याचे पती संग्राम डुबल हे स्वतः मंत्रालय कक्ष अधिकारी आहेत. तर सासरे उदयराव डुबल हे डीवायएसपी आहेत. यामुळे घरातील सुशिक्षित वातावरण असल्याने तिला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. घरच्या सोबतच केला अनेक जणांचे मार्गदर्शन लाभले. आज त्यांनी तिसऱ्यांदा स्पर्धा परीक्षेत यश मिळवत नगरपालिका मुख्याधिकारी पदी पोहोचल्या आहेत.

हेही वाचा -

IAS Officers Maharashtra : आयएएस अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे प्रशासनाचा वाढला ताण, राज्य सरकारने केंद्राकडे 'ही' केली मागणी

IAS Exam : पात्रता परीक्षेविना राज्यातील सुमारे साडेतीन हजार अधिकारी आयएएस पदापासून वंचित

Last Updated : May 27, 2023, 7:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details