महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कार्यकर्त्यांनो आंदोलन करताना जरा सावधान; राहुल गांधींचा पुतळा जाळणे बेतले असते जीवावर - कार्यकर्त्यांनो आंदोलन करताना सावधान

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील भारत बचाओ रॅलीमध्ये सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानतंर देशाभरात भाजप त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे.

kplhapur
कार्यकर्त्यांनो आंदोलन करताना जरा सावधान; राहुल गांधींचा पुतळा जाळणे बेतले असते जीवावर

By

Published : Dec 15, 2019, 7:49 PM IST

Updated : Dec 15, 2019, 8:49 PM IST

कोल्हापूर - राहुल गांधींविरोधात आंदोलन करताना आंदोलनकर्त्या तरुणाच्या पॅन्टला आग लागल्याची घटना कोल्हापुरात घडली. राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्यानंतर हा तरूण त्या पुतळ्याला लाथा मारत असताना त्याच्या पॅन्टला आग लागली. यामध्ये आंदोलनकर्त्या तरुणाच्या पायाला किरकोळ भाजले असून तो थोडक्यात बचावला आहे.

कार्यकर्त्यांनो आंदोलन करताना जरा सावधान; राहुल गांधींचा पुतळा जाळणे बेतले असते जीवावर

हेही वाचा -मटणाचा दर २० रुपयांनी केला कमी; ५४० रुपयेवर विक्रेते ठाम

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. हा संपूर्ण प्रकार कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या समोरच घडला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील भारत बचाओ रॅलीमध्ये सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानतंर देशाभरात भाजप त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. कोल्हापुरातही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तरुणांनी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून हे आंदोलन केले. पण आंदोलनादरम्यान आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या पॅन्टला लागलेली आग विझवताना आंदोलकांची तारांबळ उडाली.

Last Updated : Dec 15, 2019, 8:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details