कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाने गेल्या ४ दिवसांपासून जयप्रभा स्टुडिओच्या दरात बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे. ( Jayprabha Studio Agitation ) जयप्रभा स्टुडिओची 2 वर्षापूर्वीच विक्री झाल्याने कोल्हापूरकर आणि कलाकार आक्रमक झाले आहेत. दरम्यान, चित्रपट महामंडळाने जोपर्यंत स्टुडिओ पुन्हा मिळत नाही आणि चित्रीकरण पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
आज (बुधवारी) कलाकारांनी आणि झंकार ऑर्केस्ट्रा एकत्र येत भालजी पेंढारकर यांना जयप्रभा स्टुडिओ येथे चित्रित झालेल्या गाण्याच्या माध्यमातून मानवंदना देत उपोषणाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात केली आहे. तसेच रोज वेगवेगळ्या माध्यमातून कलाकार आपली कला सादर करत हे आंदोलन पुढे नेणार असल्याचे सांगितले आहेत. तसेच या उपोषणास अनेक संघटनांचा पाठिंबा देखील मिळत गेल्या 3 दिवसात वेगवेगळे पक्ष संघटनांनी येथे येऊन जाहीर पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभागी घेतला आहे. जयप्रभा स्टुडिओ ताब्यात घेऊन कोल्हापूरचे वैभव जतन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सुरेल गाण्याच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले -
जयप्रभा स्टुडिओसमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषच्या चौथा दिवशी कलाकारांनी आपली कला सादर करत भालजी पेंढारकर यांना जयपर्भा स्टुडिओ येथे चित्रित झालेल्या विविध गाण्याच्या माध्यमातून मानवंदना दिली गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापुरातील नामवंत आणि अनेक चित्रपटात संगीत दिलेल्या झंकार ऑर्केस्ट्राने ढोलकीच्या तालावर सुरांच्या साहाय्याने परिसर मंत्रमुग्ध केले तसेच अनेक कलाकारांनी नृत्य सादर करत हे आगळेवेगळे उपोषण सुरू ठेवले आहे.तसेच सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, यावर आता जिल्ह्यातील अनेक नेत्यांची देखील प्रतिक्रिया येत असून पालकमंत्र्यांनी देखील शासनस्तरावर विक्री झालेल्या स्टुडिओची किंमत ठरवून ती पुन्हा ताब्यात घेता येते का हे सुद्ध पाहू असे आश्वासन दिले आहे.