महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

aggressive meeting in Kolhapur : ... तर राजभवनला दोन ट्रक कोल्हापुरी पायतान पाठवण्याचा इशारा!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये आज पायतान सभा पार (aggresive meeting in Kolhapur) पडली. या सभेच्या ठिकाणी चक्क पाच फुटी पायतान साक्षीला ठेवून ही सभा घेण्यात आली.

aggresive meeting in Kolhapur
कोल्हापूरात पार पडली पायतान सभा

By

Published : Nov 29, 2022, 2:04 PM IST

कोल्हापूर :राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये आज पायतान सभा पार (aggresive meeting in Kolhapur) पडली. या सभेच्या ठिकाणी चक्क पाच फुटी पायतान साक्षीला ठेवून ही सभा घेण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटवण्याची मागणी करत त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय शिवप्रेमींचा यामध्ये समावेश होता. या सभेच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवले नाही तर राजभवनला दोन ट्रक कोल्हापुरी पायतान पाठवण्याचा इशारा देण्यात आला.


सर्वत्र संतापाची लाट :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेला वक्तव्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. कोल्हापूरात सुद्धा अनेक पक्ष संघटनांकडून त्यांचा जाहीर निषेध व्यक्तकरण्यात आला आहे. मात्र कोल्हापूरात पायतान सभा घेऊन वेगळ्या पद्धतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. सभेच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटवले नाही तर राजभवनला दोन ट्रक कोल्हापुरी पायतान पाठवण्याचा इशारा देण्यात आला (aggresive meeting held today against) आहे.

कोल्हापूरात पार पडली पायतान सभा

वादग्रस्त विधाने :गेल्या अडीच- तीन वर्षांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त विधाने सुरु आहेत. आताही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून यामुळे आंदोलने सुरू आहेत. राज्यपालांच्या विधानांबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच तात्काळ कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटवावे, अशी मागणी जोर धरत आहे. भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करताना छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वाचेच कायम आदर्श आहेत, अशी भूमिका मांडली.

ABOUT THE AUTHOR

...view details