कोल्हापूर- मागील 6 महिन्यांपासून देशभरातील हॉटेल्स, बार पूर्णपणे बंद होती. मात्र ती आजपासून 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वच व्यवसायिकांतून आनंद व्यक्त होत असून कोल्हापूरातील एका मिसळ विक्रेत्याने आपल्या पहिल्या ग्राहकाचे हार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कोल्हापूरातसुद्धा कोरोनाने अक्षरशः कहर केला होता. त्यामुळे खाद्य पदार्थांच्या पार्सलला परवानगी असूनसुद्धा अनेक जण याकडे पाठ फिरवत होते. मात्र आता कोल्हापूरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तसेच राज्य शासनाने हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता सर्वच हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये नागरिक यायला सुरुवात झाली आहे.