कोल्हापूर - चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता पुढच्या संशोधनासाठी इस्रोला बळ मिळणार असल्याचे मत येथील खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी व्यक्त केले आहे. शिवाय ही मोहीम यशस्वी झाल्यास इतर देशही नेहमीसाठी भारताकडून तांत्रिक मदत घेतील असेही त्यांनी म्हटले आहे. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
चांद्रयान-2 : यशस्वी प्रक्षेपणानंतर पुढच्या संशोधनाला मिळणार बळ - किरण गवळी
चांद्रयान 2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता पुढच्या संशोधनासाठी इस्रोला बळ मिळणार असल्याचे मत कोल्हापूरचे खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी व्यक्त केले आहे.
चांद्रयान २ चे यशस्वी झालेले उड्डाण
भारताचे हे चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर म्हणजे ज्या ठिकाणी सूर्याची किरणे पोहोचत नाहीत, त्या भागामध्ये उतरणार आहे. भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे देशासोबत संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते, यानंतर विशेष म्हणजे, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा म्हणजेच अलगद उतरणाऱ्या देशांमध्ये जगात भारताचा चौथा नंबर लागणार आहे, असेही यावेळी गवळी म्हणाले.
Last Updated : Jul 23, 2019, 2:13 PM IST