विधिवत पूजा करुन बांबवडे येथील शिवरायांचा पुतळा काढला; गावात अद्याप तणावाचे वातावरण - कोल्हापूर बांबवडे बाजार पेठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बातमी
शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील (सरूडकर) यांनी सुद्धा पुतळा हटविण्याला तीव्र विरोध केला होता. मात्र, आज सायंकाळच्या वेळी प्रशासनाने पुतळ्याभोवतीकडे करून पुतळा विधिवत पूजा करून आणि दुग्धभिषेक घालून काढला. यावेळी शिवप्रेमींनी विरोध केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून परवानगी घेऊनच पुतळा बसवा असे आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान अजूनही बांबवडे गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
विधिवत पूजा करुन बांबवडे येथील शिवरायांचा पुतळा काढला
कोल्हापूर -जिल्ह्यातल्या बांबवडे बाजारपेठेमध्ये बसवलेला शिवरायांचा पुतळा पोलीस बंदोबस्तामध्ये आणि विधिवत पूजा करून काढण्यात आला आहे. काल मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी बांबवडे बाजारपेठेच्या मुख्य चौकामध्ये शिवरायांचा पुतळा बसविला होता. मात्र, परवानगी शिवाय पुतळा हटवल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये आणि शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालून पुतळा काढण्यात आला आहे.