कोल्हापूर -गेल्या वर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये कोल्हापुरतील नागरिक प्रशासनाच्या मदतीला धावून आले होते. त्याच पद्धतीने आता पुन्हा एकदा कोल्हापूरवासियांच्या सहकार्याची गरज आहे. सर्वांनी शक्य ती मदत करावी, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. कोल्हापूरकर प्रत्येक संकटावेळी एका कुटुंबाप्रमाणे धावून येतात, हे पुन्हा एकदा दाखवून द्या, असेही त्या म्हणाल्या.
डॉ. कादंबरी बलकवडेंना कोल्हापूरकरांकडून सहकार्याची अपेक्षा आहे आताही नागरिकांच्या सहकार्याची गरज -
गेल्या वर्षी कोल्हापूरच्या नागरिकांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला मोठी मदत केली होती. अनेकांनी मास्क, सॅनिटायझर, आरोग्य विभागाला गरज असणारे साहित्य, बेड, व्हेंटिलेटरसह लाखोंची मदत केली होती. काहींनी आपले वाढदिवस साजरे न करता त्या दिवशी होणाऱ्या खर्चाच्या रक्कमेतून समाजासाठी मदत केली होती. आता पुन्हा एकदा कोरोनाचे संकट डोळ्यासमोर आहे. त्यामुळे पुन्हा आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे डॉ. बलकवडे म्हणाल्या.
हेही वाचा -जिल्ह्यात 60 ठिकाणी नाकाबंदी; विनाकारण बाहेर पडल्यास होणार कारवाई