कोल्हापूर - राज्य शासनाने पूरग्रस्तांना मदत जाहीर केली असून प्राथमिक स्वरुपात 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मदत वाटपाचे काम सुरू आहे. यावेळी, ज्या घरात आमच्यासारखे भाडेकरू राहतात त्यांना मदत मिळत नाही. शिवाय आमच्याकडे रेशन कार्डसुद्धा नाही त्यामुळे आम्ही काय करावे, असा प्रश्न एका महिलेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना विचारला असता ते निरुत्तर झाले. तर, शेजारीच असेलेले आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वेळ मारून नेत आपल्याला सुद्धा मदत मिळेल, आम्ही तसे तहसीलदारांना सांगतो, असे आश्वासन दिले.
... आणि आदित्य ठाकरे झाले निरुत्तर
आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी प्रथम कोल्हापुरातील बापट कॅम्प या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर येथील आंबेवाडी आणि चिखली या 2 पूरग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी आंबेवाडी येथील मारुती मंदिरामध्ये एका महिलेने शासनाची आम्हा भाडेकरूंना मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यावर, आदित्य ठाकरे निरुत्तर झाले.
आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी प्रथम कोल्हापुरातील बापट कॅम्प या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. ठाकरे यांनी पाण्याच्या टाक्या तसेच एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले. शिवाय शिवसेना आपल्या पाठीशी आहे, असा धीरसुद्धा दिला. त्यानंतर येथील आंबेवाडी आणि चिखली या दोन पूरग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी आंबेवाडी येथील मारुती मंदिरामध्ये एका महिलेने शासनाची आम्हा भाडेकरूंना मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यावर, आदित्य ठाकरे निरुत्तर झाले. तर, एकनाथ शिंदे यांनी सर्वांनाच मदत मिळेल आणि रेशन कार्ड नसेल तरीही मदत मिळेल, असे वेळ मारून नेत आश्वस्त केले.
मात्र, शासनाचे अशाप्रकारे मदत करण्याबाबत दोन आदेश आहेत. यामध्ये सूसुत्रतेचा अभाव असल्यामुळे गोंधळाची परिस्थिती आहे. शिवाय सुधारित आदेश निघणार असल्याचेही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर कृती कितपत होणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.