कोल्हापूर : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा (Actress Kalyani Jadhav Accident Case) काल कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक अपघातात मृत्यू (Actress Kalyani Jadhav Accidental Death) झाला. याप्रकरणी एका ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला (Police Case filed against tractor driver) असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, कल्याणी मोपेडवरून घरी जात असताना संबंधित ट्रॅक्टरचालकाने पाठीमागून धडक दिल्याने (Tractor hit Kalyani Jadhav bike) हा अपघात झाला. महादेव पाटील (रा. कसबा बीड) असे या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. Latest news from Kolhapur, Kolhapur Crime
Actress Kalyani Jadhav Accident Case : अभिनेत्री कल्याणी जाधव अपघात प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल - अभिनेत्री कल्याणी जाधव अपघात प्रकरण
'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा (Actress Kalyani Jadhav Accident Case) काल कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक अपघातात मृत्यू (Actress Kalyani Jadhav Accidental Death) झाला. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर सांगली महामार्गावर तिने 'प्रेमाची भाकरी' या नावाने हॉटेल सुरू केले होते. हॉटेल बंद करून घरी परतत असताना ट्रॅक्टरने धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Police Case filed against tractor driver, Tractor hit Kalyani Jadhav bike, Latest news from Kolhapur, Kolhapur Crime
असा झाला मृत्यू :कोल्हापूर सांगली महामार्गावर हालोंडीजवळ डंपरच्या धडकेत एका अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. कल्याणी कुरळे जाधव असे या अभिनेत्रीचे नाव असून तिने 'तुझ्यात जीव रंगला' यासह अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर सांगली महामार्गावर तिने 'प्रेमाची भाकरी' या नावाने हॉटेल सुरू केले होते. हॉटेल बंद करून घरी परतत असताना ट्रॅक्टरने धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
प्रशासनाकडून दुर्लक्ष : कल्याणी कुरळे जाधव मूळची कोल्हापूरची असून माहेर हे राजारामपुरी आहे. तर ते सध्या महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास आहेत. कोल्हापूर सांगली महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे गेल्या काही दिवसापूर्वीच शेतकरी संघटनेकडून या मार्गावर आंदोलन करण्यात आले होते; मात्र आता याच रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे मृत्यू झाल्याने महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.