महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ambabai Temple : आता अंबाबाई मंदिरात भक्तांना मिळणार 'वृक्षप्रसाद'; अभिनेते मनोज वाजपेयी, सयाजी शिंदेंच्या हस्ते योजनेचा शुभारंभ

सुप्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी ( Actors Manoj Bajpayee ) सयाजी शिंदे ( Sayaji Shinde ) यांच्या हस्ते अंबाबाई ( Mahalakshmi Ambabai Temple Kolhapur ) मंदिरात वृक्षप्रसाद योजनेचा शुभारंभ ( Launch of Vrikshaprasad Yojana ) करण्यात आला.

Actors Manoj Bajpayee
Actors Manoj Bajpayee

By

Published : Dec 3, 2022, 8:00 PM IST

कोल्हापूर :करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात ( Mahalakshmi Ambabai Temple Kolhapur ) आता भक्तांना दर्शन घेतल्यानंतर वृक्ष प्रसाद मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी ( Actors Manoj Bajpayee ) सयाजी शिंदे ( Sayaji Shinde ) यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी हा लोकार्पण सोहळा पार पडला.

अभिनेते मनोज वाजपेयी, सायजी शिंदे यांच्या हस्ते अंबाबाई मंदिरात वृक्षप्रसाद

घेतला वृक्षप्रसादचा लाभ -भक्तांनी हा वृक्षप्रसाद ( Launch of Vrikshaprasad Yojana ) स्वीकारून आपल्या घरोघरी एक वृक्ष रोपण करण्याच्या हेतूने ही योजना सुरू केली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी अभिनेते मनोज वाजपेयींनी पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, वृक्षारोपणाची गरज सांगत अशा उपक्रमाला कोल्हापुरातून सुरुवात होते ही आनंदाची बाब असल्याचेही ते म्हणाले.



स्थानिक देशी झाडे लावावीत हा उद्देश -स्थानिक देशी झाडे मोठ्या प्रमाणात लोकांनी लावावीत. त्याची उपयुक्तता समजावी यासाठी कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरामध्ये वृक्षप्रसाद योजनेच्या अंतर्गत भाविकांना झाडाच्या स्वरूपात प्रसाद म्हणून कलशामध्ये रोप देण्यात आले. उपक्रम देवस्थान व्यवस्थापन समिती, सामाजिक वनीकरण विभाग कोल्हापूर, देवराई यांच्या संयुक्तपणे राबविण्यात येणार आहे. यामध्ये पारिजात, तुळस, लिंबू, माळुंग, बेल इत्यादी ही देशी उपयुक्त झाडे देण्यात आली. जवळपास 50 हजार झाडे प्रसाद म्हणून देण्यात येणार आहेत अशी माहिती अभिनेते सायजी शिंदे यांनी दिली. या उपक्रमातून स्थानिक देशी उपयुक्त झाडांचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होणार असून भाविक रोपे आपल्या अंगणात, टेरेसवर, कुंडीमध्ये, शेताच्या बांधावर लावतील हा या उपक्रमाचा हेतू आहे असेही ते म्हणाले.

मनोज वाजपेयी यांनी अंबाबाई मंदिरात केले ध्यान -देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर आणि सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे सुप्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुक्रवार सायंकाळी वृक्षप्रसाद योजनेचा लोकार्पण सोहळा मंदिरामध्ये पार पडला. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांनी अंबाबाई मंदिरात आई अंबाबाईचे आशीर्वाद तर घेतलेच शिवाय मंदिरातील गाभाऱ्यात तब्बल 5 ते 10 मिनिटे ध्यान केले.

ABOUT THE AUTHOR

...view details