महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू; तपासानंतर दोषींवर कारवाई करणार- जयश्री गायकवाड - Social worker death Kolhapur

याबाबत तपास सुरू असून, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे इचलकरंजीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी म्हटले. ५० टक्क्यांहून अधिक भाजल्याने भोरे यांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर संपूर्ण इचलकरंजी शहरामध्ये खळबळ माजली आहे.

'त्या' सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू
'त्या' सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू

By

Published : Oct 26, 2020, 6:39 PM IST

कोल्हापूर- इचलकरंजी नगरपरिषदे बाहेर स्वतःला पेटवून घेणारे नरेश भोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, याबाबत तपास सुरू असून, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे इचलकरंजीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी म्हटले आहे. ५० टक्क्यांहून अधिक भाजल्याने भोरे यांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर संपूर्ण इचलकरंजी शहरामध्ये खळबळ माजली आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ दिवसांपूर्वी इचलकरंजी येथील शहापूर रस्त्यावरून मेलेले डुक्कर घंटागाडीतून नेण्याऐवजी घंटागाडीला बांधून रस्त्यावरून फरफटत ओढून नेले जात होते. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून तत्काळ गाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेण्यास घंटागाडी चालकास अटकाव केला. त्यावरून संबंधित गाडीच्या चालकाने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. तसेच, त्यांच्यावर दहशत निर्माण करून त्यांना मेलेले डुक्कर उचलून घंटागाडीत टाकण्यास भाग पाडले होते.

या घटनेच्या निषेधार्थ भोरे यांनी संबंधितांवर कारवाई व्हावी याबाबत निवेदन दिले होते. मात्र, कारवाई झाली नसल्याने भोरे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेतली नसल्याने आज भोरे यांनी नगरपालिका परिसरातच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामध्ये ते गंभीररित्या भाजले गेले होते. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल असे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा-इचलकरंजी नगरपालिकेच्या आवारात स्वत:ला पेटवून घेणाऱ्या 'त्या' सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details