कोल्हापूर -कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज एक हजारपेक्षा अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. तर, ४० ते ५० रुग्णांचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर १६ मे पासून जिल्ह्यात कडक लॉकडाउन सुरू आहे. सोमवार (२३ मे)पर्यंत हा लॉकडाउन कायम असणार आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या अनेक लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 'मॉर्निंग वॉक'साठी बाहेर पडलेल्या तब्बल 2 हजारपेक्षा अधिक नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात दंडही वसूल केला आहे.
कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, सुमारे १० लाखांचा दंड वसूल
कोल्हापूरमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या अनेक लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. आजपर्यंत २ हजारांहून अधिकांवर कारवाई करून, एकूण ९ लाख २० हजारांच्या आसपास दंड वसूल करण्यात आला आहे.
16 तारखेपासून झालेली कारवाई
16 मे 2021 : 119 जणांवर कारवाई आणि 52 हजार 900 रुपये दंड वसूल
17 मे 2021 : 174 जणांवर कारवाई आणि 72 हजार 400 रुपये दंड वसूल
18 मे 2021 : 390 जणांवर कारवाई आणि 1 लाख 74 हजार 500 रुपये दंड वसूल
19 मे 2021 : 380 जणांवर कारवाई आणि 1 लाख 56 हजार 800 रुपये दंड वसूल
20 मे 2021 : 375 जणांवर कारवाई आणि 1 लाख 45 हजार 900 रुपये दंड वसूल
21 मे 2021 : 383 जणांवर कारवाई आणि 1 लाख 67 हजार 700 रुपये दंड वसूल
आज (२२ मे) रोजी ३०० च्या आसपास नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून दीड लाखांच्या आसपास दंड वसूल करण्यात आला आहे. असे आजपर्यंत २ हजारांहून अधिकांवर कारवाई करून एकूण ९ लाख २० हजारांच्या आसपास दंड वसूल झाला आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारक आणि इतर नागरिकांवरही कारवाई करण्यात आली आहे.