प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर कोल्हापूरkolhapur News : पुरोगामी विचारांच्या कोल्हापूर जिल्ह्यात भोंदूगिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असाच एक प्रकार सोमवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं उघड करण्यात आला आहे. पंधरा वर्षाचा अल्पवयीन मुलगा स्वामींचा अवतार आहे. तुम्ही पाच गुरुवारी माझ्याकडे या, अशा प्रकारे नागरिकांत अंधश्रध्दा पसरवणाऱ्या आई-वडिलांवर मंगळवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात (Shahupuru Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्त जयंती निमित्त कदमवाडी रोड कसबा बावडा येथे महाप्रसादाचे वाटप ठेवले होते. यावेळी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. याच वेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर या भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला आहे.
कोल्हापूर शहरातील कसबा बावडा : कदमवाडी रोडवर चौगले कॉलनीत इंद्रायणी हितेश वलादे, त्यांचे पती हितेश लक्ष्मण वलादे यांनी घरातच मंदिरासारखे वातावरण निर्माण केले होते. आपला पंधरा वर्षाचा मुलगा स्वामींचा अवतार आहे. तो जो बोलतो तसेच होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुलदैवताची पूजा करा. स्वामींच्या नावाने प्रसाद वाटप करा. तसेच बाल स्वामींचे 5 गुरुवारी दर्शन घेतल्यास इच्छा पूर्ण होईल. अशा प्रकारे लोकांमध्ये अंधश्रध्दा पसरवली होती. या सर्व प्रकाराची माहिती अनिसच्या कार्यकर्त्या डॉ. मुक्ता दाभोलकर (Mukta Dabholkar) यांना कळाली होती. काल मुक्त दाभोलकर यांनी पुण्यातून कोल्हापूर पोलिसांना याची माहिती दिली.
वलादे दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात: दत्त जयंती दिवशी या दाम्पत्याने लोकांकडून शिधा मागून जवळपास 5 हजार लोकांना महाप्रसादाचे आयोजन केले होते. सायंकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासांठी नागरीकांनी रांगा लावल्या होत्या. याबाबत अंधश्रंध्दा निर्मुलन पथकाकडून पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्यासह पोलीसांचे पथक या ठिकाणी पोहोचले. वलादे दाम्पत्यास ताब्यात घेऊन त्यांना चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी या दांपत्याची कसून चौकशी करण्यात आली.
वलादे दाम्पत्यांवर गुन्हा दाखल : पोलिस उपनिरीक्षक विश्वास कुरणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वलादे दाम्पत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापुरातील कसबा बावड्यात हा प्रकार खुलेआम सुरू असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याची गंभीर दखल घेतली आहे. यापुढे असे भोंदू बाबाचे प्रकार उघडकीस आणून शालेय विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा -
- काळया घोड्याच्या नावाने भोंदूगिरी करणाऱ्यांस जेरबंद, अंनिसच्या प्रयत्नांने भांडाफोड
- Amravati News: अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान देताच चुलीवरील बाबांचे पितळ उघडे; गावातून ठोकली धूम
- Anti Witchcraft Law : अंद्धश्रद्धा आणि जादूटोणा विरोधा कायदा जास्त कडक करावा - अंनिस