कोल्हापूर- पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गवर ट्रक, टेम्पो आणि कार यांच्यात विचित्र अपघात झाला आहे. या तिहेरी अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गवर तिहेरी अपघातात चौघे गंभीर जखमी - kolhapur latest news
बेंगलोरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. ट्रक डिव्हायडर ओलांडून विरोधी दिशेने गेला. यावेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारला समोरासमोर धडक बसली.
पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गवर सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास शिरोली जवळ ट्रक, टेम्पो आणि कार यांच्यात अपघात झाला. बेंगलोरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. ट्रक डिव्हायडर ओलांडून विरोधी दिशेने गेला. यावेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारला समोरासमोर धडक बसली. तसेच, कारच्या पाठोपाठ असणाऱ्या आयशर टेम्पोनी कारला मागून येवून डाव्या बाजूस धडक दिली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत.
TAGGED:
kolhapur latest news