कोल्हापूर - आशा वर्कर्स महिलांना मानधनवाढ मिळावी, या प्रमुख मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनने मंगळवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे सहा हजार पेक्षा अधिक आशा गटप्रवर्तक महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत.
कोल्हापुरात आशा वर्कर्सचे मानधनवाढीसाठी बेमुदत चक्री उपोषण आंदोलन - kolhapur aasha worker
कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनने मंगळवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे सहा हजार पेक्षा अधिक आशा गटप्रवर्तक महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत.
बेमुदत चक्री उपोषण आंदोलन
महिलांनी सरकार विरोधात दिलेल्या घोषणांमुळे जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनने दिला आहे.