महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवाजी विद्यापीठास नॅकचे A++ मानांकन; चंद्रकांत पाटील यांनी कुलगुरूंचे केले अभिनंदन

नुकतेच शिवाजी विद्यापीठास नॅकचे ३.५२ ‘सीजीपीए’ गुणांकनासह A++ मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यापीठाच्या या उल्लेखनीय मानांकनाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची भेट घेऊन अभिनंदन केले.

Chandrakant Patil meet Vice Chancellor Shirke
चंद्रकांत पाटील भेट कुलगुरू शिर्के

By

Published : Apr 3, 2021, 6:26 PM IST

Updated : Apr 3, 2021, 8:02 PM IST

कोल्हापूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज शिवाजी विद्यापीठास नॅकचे A++ मानांकन व न्यू कॉलेजला A+ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल सदिच्छा भेट दिली. नुकतेच शिवाजी विद्यापीठास नॅकचे ३.५२ ‘सीजीपीए’ गुणांकनासह A++ मानांकन प्राप्त झाले आहे. विद्यापीठाच्या या उल्लेखनीय मानांकनाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची भेट घेऊन अभिनंदन केले. याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाला मिळालेल्या मानांकनासह विविध शैक्षणिक विषयांवर सविस्तर चर्चा केली.

कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याशी चर्चा करताना भाजप नेते चंद्रकांत पाटील

हेही वाचा -कोल्हापूर जिल्ह्यात आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा; रक्तदान करण्याचे प्रशासनाकडून आवाहन

विद्यापीठात बॅटरीवर चालणाऱ्या गाडीतून चंद्रकांत पाटील यांचा प्रवास

आज शिवाजी विद्यापीठामध्ये 'नो व्हेइकल डे' असल्यामुळे पाटील यांनी विद्यापीठाच्या गेट पासून ते मुख्य इमारती पर्यंतचा प्रवास विद्यापीठाच्या बॅटरीवर चालणाऱ्या गाडीतून केला. पर्यावरणपूरक या उपक्रमाचे त्यांनी कौतुकही केले. शिवाजी विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये सर्वोच्च मानांकन असणारे नॅकचे A+ हे मानांकन न्यू कॉलेजला प्राप्त झाले. यानिमित्त त्यांनी न्यू कॉलेजलाही सदिच्छा भेट दिली.

विद्यापीठाची जबाबदारी वाढली

शिवाजी विद्यापीठाला नॅकचे A++ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे, आता विद्यापीठाची जबाबदारी वाढली असल्याचे म्हणत, पुढील मानांकन प्राप्त होण्यासाठी, तसेच विद्यापीठाचे नावलौकिक वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील वाटचालीस पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, रजिस्ट्रार डॉ. व्ही.डी. नांदवडेकर, डॉ. आर.के. कामत, प्रा. एन.बी. गायकवाड, प्रा. एम.एस. देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा -'अर्जेरिया शरदचंद्रजी'! जगात प्रथमच सापडलेल्या वनस्पतीला दिले शरद पवारांचे नाव

Last Updated : Apr 3, 2021, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details