कोल्हापूर- करवीर तालुक्यातील केर्ली येथील एका विवाहितेने आपल्या दोन मुलींसही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली . शिल्पा नागेश चव्हाण असे मृत विवाहितेचे नाव असून वैभवी (वय ६ वर्षे) आणि देवयानी (वय ८ वर्षे) असे मृत मुलींची नावे आहेत. सदर घटनेची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
कोल्हापुरात विवाहितेची दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
शिल्पा ही दोन दिवसांपूर्वी आपल्या माहेरी केर्ली या गावी आली होती. काल सायंकाळपासून शिल्पा आपल्या मुलींसोबत बेपत्ता होती. तिचा शोध सुरू असतानाच गावातील एका विहिरीत दोन मुलींसह शिल्पाचा मृतदेह आढळून आला.
शिल्पाचा दहा वर्षांपूर्वी शिंगणापूर येथील नागेश चव्हाण यांच्याशी विवाह झाला होता. शिल्पा या एका हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी करत होत्या. तर नागेश हा गावात चप्पल शिवणे व शासकीय दाखले काढून देण्याचे काम करत होता. शिल्पा ही दोन दिवसांपूर्वी आपल्या माहेरी केर्ली या गावी आली होती. काल सायंकाळपासून शिल्पा आपल्या मुलींसोबत बेपत्ता होती. तिचा शोध सुरू असतानाच गावातील एका विहिरीत दोन मुलींसह शिल्पाचा मृतदेह आढळून आला. मोठी मुलगी देवीयानी ही इयत्ता दुसरीमध्ये तर वैभवी अंगणवाडीत शिकत होती. शिल्पाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा-कोल्हापूरच्या सुपुत्राला जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण