कोल्हापूर- गडिंग्लज तालुक्यातील यूरोलॉजिस्ट डॉ. प्रकाश गुणे यांनी भारतीय सैन्य दलाला तब्बल 1 कोटींची मदत दिली आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे त्यांनी हा धनादेश सुपूर्द केला आहे. राजनाथसिंह यांनीही याबाबत ट्विटरद्वारे कोल्हापुरातील डॉ. गुणे व त्यांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
गुणे कुटुंबियांची चौथी पिढी वैद्यकीय सेवेत
कुटुंबियांची चौथी पिढी वैद्यकीय सेवेत आहे. मिळालेल्या उत्पन्नातील काही वाटा समाजसेवेसाठी, मदतीसाठी दिला पाहिजे ही भावना ठेवून त्यांनी सैन्य दालाच्या मदतीसाठी ते पुढे आले असून तब्बल 1 कोटींची मदत त्यांनी दिली आहे. 13 ऑगस्टला दिल्ली येथे जाऊन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे त्यांनी या मदतीचा धनादेश सुपूर्द केला. राजनाथ सिंह यांनीही आनंद व्यक्त करत गुणे कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.