कोल्हापूर/ सातारा - एसटी बसमध्ये अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडू असलेल्या एका पोलिसावर कराड शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. महेश मारुती मगदूम, असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, सदरचा गुन्हा बोरगाव हद्दीत घडल्यामुळे तपासासाठी बोरगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
अल्पवयीन तरूणीचा विनयभंग; कोल्हापूरमधील पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल - Kolhapur police
एसटी बसमध्ये अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडू असलेल्या एका पोलिसावर कराड शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. महेश मारुती मगदूम, असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
Etv Bharat
या गुन्ह्यातील संशयित आरोपी महेश मगदूम हा कोल्हापूर पोलीस दलातील स्पोर्टमन आहे. तो कबड्डीपटू असून प्रो कबड्डी लीगमध्ये देखील त्याची निवड झालेली होती. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे पोलीस दलाची मोठी नाचक्की झाली आहे. साताऱ्यात सुरू असलेल्या पोलीस क्रीडा स्पर्धेचा सोमवारी समारोप झाला. मात्र, कोल्हापूच्या पोलिसाने केलेल्या संतापजनक कृत्यामुळे क्रीडा स्पर्धेला देखील गालबोट लागले आहे.
Last Updated : Oct 18, 2022, 8:10 AM IST