कोल्हापूर - कोल्हापूरात कळंबा मध्यवर्ती कारागृहात वारंवार मोबाईल सापडण्याच्या तसेच गांज्या मिळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. बुधवारी (दि. 23 डिसें.) पुन्हा एकदा अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. 10 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह, 5 चार्जर केबलसह 775 ग्रॅम गांजाचा मोठा साठा दोन अज्ञात व्यक्तींनी कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरून आतमध्ये फेकला. या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा साठा नेमका कोणी व कोणासाठी होता याचा तापस सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर कारागृह सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कळंबा कारागृहात 10 मोबाईलसह गांजा साठा फेकला; दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल - कोल्हापूर गुन्हे बातमी
19:35 December 23
कळंबा कारागृहात 10 मोबाईलसह गांजा साठा फेकला; दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल
अज्ञात व्यक्तींनी कापडामध्ये गुंडाळून फेकले मोबाईल आणि गांजा
मिळालेल्या महितीनुसार, दोन अज्ञात व्यक्तींनी कापडाच्या पुडक्यात गुंडाळले 10 मोबाईल्स, 2 पेन ड्राईव्ह, 5 चार्जर केबल, 775 ग्रॅम गांजा कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरून कारागृहात फेकले. हा प्रकार कारागृह रक्षक रवींद्र भाट यांच्या निदर्शनास आला. त्यानुसार त्या कापडाच्या पुडक्यात या वस्तू मिळून आल्या. याबाबत रीतसर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही मध्ये सुद्धा दोन अज्ञात व्यक्त एका चारचाकी वाहनातून आल्याचे दिसले असल्याचे समजले असून त्यानुसार तपास करण्यात येत आहे. कारागृह अधीक्षक शरद शेळके सुद्धा सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयित आणि वाहनांचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप त्यात यश आले नाहीये. दरम्यान, बहुचर्चित ठरलेल्या कोल्हापूरातील कळंबा कारागृहात गांजा सदृश्य अमली पदार्थ साठा आणि मोबाईल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -कोल्हापूर : बेशिस्त अधिकाऱ्यांवर जिल्हा नागरी कृती समिती आक्रमक; आंदोलनाचा इशारा
हेही वाचा -अंबाबाई आणि जोतिबा चरणी यंदा तब्बल 'इतक्या' किंमतीचे दागिने दान