कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा बँकेचे निवडणूक होत असून आज (बुधवारी) मतदान सुरु पार पडले आहे. 21 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या असून या 15 जागांसाठी निवडणूक लागली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपाच्या विरोधात शिवसेनेने पॅनेल केले असून यांच्यामध्ये ही लढत होत आहे. मात्र आपलाच सर्व जागांवर विजय होईल, असा दावा शिवसेना तसेच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा केला आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय दिवासाअखेर एकूण ९९ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्हा बँकेत आजपर्यंत झालेल्या उत्कृष्ट कामाची पोचपावती म्हणून सभासद मोठ्या मातांनी आपल्या पॅनेलला विजयी करतील. सकाळपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहून सर्वच जागांवर आपला विजय होईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांनी माध्यमांना दिली.
'राक्षसी महत्वाकांक्षामुळे निवडणूक लागली'
जिल्हा बँक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही सर्वांनीच मनापासून प्रयत्न केले होते. मात्र शिवसेनेने 3 जागांसाठी आग्रह धरला होता. आम्ही सुद्धा दोन जागा देऊन एक स्वीकृत द्यायला तयारच होतो मात्र त्यांनी मान्य केले नाही. शेवटी राक्षसी महत्वाकांक्षामुळे ही निवडणूक लागली, अशी प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. शिवाय आमचा सर्वच जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय होईल, असा दावा सुद्धा त्यांनी केला.
'आमचाही सर्व जागांवर विजय निश्चित'