महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आठव्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला सुरुवात - आठवे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन

कोल्हापूरमध्ये ग्रंथदिंडीने आठव्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला शनिवारी सुरुवात झाली. कोल्हापुरातील गांधी मैदानात पुढील तीन दिवस हे संमेलन सुरू राहणार आहे.

संत साहित्य संमेलन
संत साहित्य संमेलन

By

Published : Dec 28, 2019, 4:41 PM IST

कोल्हापूर - अखिल भारतीय संत साहित्य परिषदेच्या आठव्या साहित्य संमेलनाचा मान यावर्षी कोल्हापूरला मिळाला आहे. या संमेलनाची सुरुवात शनिवारी ग्रंथदिंडीने झाली. कोल्हापुरातील गांधी मैदानात पुढील तीन दिवस हे संमेलन सुरू राहणार आहे.

अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला सुरुवात


शनिवारी सकाळी भवानी मंडप येथून टाळ मृदुंगाच्या गजरात महापौर अ‌ॅड. सुरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते ग्रंथ आणि अश्व पूजन झाले. यानंतर ग्रंथ दिंडीची सुरुवात झाली. लहान मुले, ज्येष्ठ वारकऱ्यांच्यासह महिला या दिंडीमध्ये सहभागी झाल्या. झांज पथकाच्या ठेक्यावर मुलींनी लेझीम सादर केली.

हेही वाचा - 'फायदा कोणाला..? कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करा'

वारकरी महिलांसह महापौर लाटकर यांनीही फुगडीचा आनंद लुटला. संमेलनामध्ये राज्यातील वारकरी संप्रदायाचे अभ्यासक, दिंडीकरी, फडकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार भाग घेणार आहेत. या दरम्यान चर्चासत्र, भजन, भारुड, कीर्तन हे कार्यक्रम पार पडणार आहेत. या संत साहित्य संमेलनाची सांगता समारोप सोमवारी 30 डिसेंबरला होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details