कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. बुधवारी दिवसभरात 81 नवे रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 80 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 773 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 52 हजार 60 इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 52 हजार 60 वर पोहोचली आहे. त्यातील 49 हजार 515 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 743 इतकी झाली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 773 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1 हजार 771 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील - 60 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 1 हजार 938 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 3 हजार 635 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 27 हजार 641 रुग्ण
51 ते 70 वर्ष -14 हजार 981 रुग्ण
71 वर्षांवरील - 3 हजार 805 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 52 हजार 60 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 914
2) भुदरगड - 1 हजार 262
3) चंदगड - 1 हजार 235
4) गडहिंग्लज - 1 हजार 563
5) गगनबावडा - 156
6) हातकणंगले - 5 हजार 425
7) कागल - 1 हजार 706