कोल्हापूर -वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो. सर्वजण आपल्या प्रियजनांचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, वाढदिवसाच्या दिवशी आपल्या जवळचे कोणीही आपल्या सोबत नसेल नक्कीच निराश वाटते. कोल्हापुरातील सायबर कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका ८०वर्षीय आजोबांनाही असाच अनुभव आला असता मात्र, रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कोरोनाबाधित रुग्णांनी या आजोबांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा दिवस अविस्मरणीय बनवला.
कोविड केअर सेंटरमध्ये साजरा झाला 80 वर्षीय आजोबांचा वाढदिवस - कोल्हापूर कोविड केअर सेंटर न्यूज
कोल्हापूर येथील व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने उभारण्यात आलेल्या मोफत कोविड केअर सेंटरमध्ये उजळाईवाडी येथील वृद्ध नागरिक उपचार घेत आहेत. त्यामुळे ते यावर्षी आपल्या कुटुंबीयांसोबत आपला ८०वा वाढदिवस साजरा करू शकत नव्हते. ही बाब समजल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता संताजी घोरपडे आणि डॉक्टर संगीता निंबाळकर यांच्यासह इतर कोरोना रुग्णांनी कोविड सेंटरमध्ये या आजोबांचा वाढदिवस करण्याचे ठरवले.
![कोविड केअर सेंटरमध्ये साजरा झाला 80 वर्षीय आजोबांचा वाढदिवस Corona Center Birthday](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8699686-thumbnail-3x2-bd.jpg)
कोल्हापूर येथील व्हिजन चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने उभारण्यात आलेल्या मोफत कोविड केअर सेंटरमध्ये उजळाईवाडी येथील 80वर्षीय नागरिक उपचार घेत आहेत. हे आजोबा दरवर्षी कुटुंबीयांसोबत आपला वाढदिवस साजरा करतात. मात्र, त्यांना 10 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यांना संताजी घोरपडे व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सायबर कॉलेज येथे उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे ते यावर्षी आपल्या कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करू शकत नव्हते. ही बाब समजल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता संताजी घोरपडे आणि डॉक्टर संगीता निंबाळकर यांच्यासह इतर कोरोना रुग्णांनी कोविड सेंटरमध्ये या आजोबांचा वाढदिवस करण्याचे ठरवले.
सर्वांनी केक कापून या आजोबांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी व्हिडीओ कॉलकरून त्यांच्या कुटुंबीयांना देखील वाढदिवसात सहभागी करून घेतले होते. विशेष म्हणजे, कोल्हापूरच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातील एक पत्रकार सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर याच कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी या आजोबांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन आपल्या मोबाईलमध्ये कैद केले.