कोल्हापूर - धामणी खोऱ्यातील ७ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. या ७ गावानी मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेऊन आज मतदानाचा हक्क बजावला.
कोल्हापूर : धामणी खोऱ्यातील ७ गावांचा निवडणुकीवरील बहिष्कार मागे, बजावला मतदानाचा हक्क - Lok Sabha
धामणी खोऱ्यातील मतदानावर बहिष्कार टाकलेल्या गावांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.
![कोल्हापूर : धामणी खोऱ्यातील ७ गावांचा निवडणुकीवरील बहिष्कार मागे, बजावला मतदानाचा हक्क](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3084161-thumbnail-3x2-kolhapur.jpg)
कोल्हापूर : धामणी खोऱ्यातील ७ गावांचा निवडणुकीवरील बहिष्कार मागे, बजावला मतदानाचा हक्क
धामणी खोऱ्यातील मतदानावर बहिष्कार टाकलेल्या गावांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. यात पन्हाळा तालुक्यातील कोदवडे. आकुर्डे, सुळे बाधुर्डे, पनोद्रे ही गावे आहेत. राधानगरी तालुक्यातील माणबेट आणि चौके या गावातील गावकऱ्यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेवून मतदान केले, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.