कोल्हापूर - आपटेनगर भागातील यशवंत सहकारी बँकेवर भरदिवसा दरोडा पडल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून बँकेतून ६२ हजारांची रोकड पळवली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून बँकेवर दरोडा; ६२ हजाराचा मुद्देमाल पळवला - कोल्हापूर
कोल्हापुरातील यशवंत सहकारी बँकेत पुन्हा दरोडा पडल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी श्वान पथकाच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्यांना अपयश आले. पुन्हा दरोडेखोरांचा तपास सुरू आहे. दरम्यान याच बँकेच्या कळे येथील शाखेत २ महिन्यांपूर्वी दरोडा पडला होता. त्यावेळी कोट्यवधी रुपये चोरट्यानी लंपास केले होते. तसेच बाजाराभोगाव येथील शाखेमध्ये चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यामुळे चोरट्यांचा टार्गेटवर वारंवार हीच बँक का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.