महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात दिवसभरात उच्चांकी 61 जणांचा मृत्यू तर 998 नवे रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 78 हजार 995 वर पोहोचली आहे. त्यातील 65 हजार 277 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी दिवसभरात कोल्हापुरात उच्चांकी 61 जणांचा मृत्यू झाला असून 998 नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 1189 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 10 हजार 987 वर पोहोचली आहे.

corona patient died In Kolhapur
कोल्हापूरात दिवसभरात उच्चांकी 61 जणांचा मृत्यू

By

Published : May 11, 2021, 9:31 AM IST

कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः कहर सुरू केला आहे. सोमवारी दिवसभरात कोल्हापुरात उच्चांकी 61 जणांचा मृत्यू झाला असून 998 नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 1189 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 10 हजार 987 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 78 हजार 995 इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 78 हजार 995 वर पोहोचली आहे. त्यातील 65 हजार 277 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 987 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 731 झाली आहे.

वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

  • 1 वर्षाखालील - 116 रुग्ण
  • 1 ते 10 वर्ष - 2819 रुग्ण
  • 11 ते 20 वर्ष - 5701 रुग्ण
  • 21 ते 50 वर्ष - 43737 रुग्ण
  • 51 ते 70 वर्ष -21254 रुग्ण
  • 71 वर्षांवरील - 5368 रुग्ण

जिल्ह्यात असे एकूण 78 हजार 995 रुग्ण झाले आहेत.

तालुक्यानुसार नवीन रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

  1. आजरा - 8
  2. भुदरगड - 56
  3. चंदगड - 41
  4. गडहिंग्लज - 7
  5. गगनबावडा - 1
  6. हातकणंगले - 122
  7. कागल - 32
  8. करवीर - 128
  9. पन्हाळा - 35
  10. राधानगरी - 5
  11. शाहूवाडी - 4
  12. शिरोळ - 120
  13. नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 55
  14. कोल्हापुर महानगरपालिका - 252
  15. इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 87

ABOUT THE AUTHOR

...view details