महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात मागील तीन महिन्यात 6 हजार नवे कोरोना रुग्ण - तीन महिन्यात 6 हजार नवे कोरोना रुग्ण

8 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 36 इतकी होती. तर एकूण 1 हजार 710 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 929 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1 हजार 844 झाली आहे.

कोल्हापूर मनपा
कोल्हापूर मनपा

By

Published : Apr 16, 2021, 8:30 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये 8 जानेवारी रोजी शेवटचे 36 रुग्ण आढळले होते. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाली आहे. ही संख्या आजही मोठ्या संख्येने वाढतच चालली आहे. 8 जानेवारी ते 15 एप्रिलपर्यंत तब्बल 6 हजार 70 रुग्ण आढळले आहेत. राज्यभरात लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र कोल्हापुरात गेल्या तीन महिन्यातील आकडेवारीवर नजर टाकल्यास चित्र काहीसा दिलासादायक पहायला मिळत आहे.



ही आहे जिल्ह्यातील सद्यस्थितीत एकूण कोरोना आकडेवारी

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 55 हजार 663वर पोहोचली आहे. त्यातील 50 हजार 910 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 8 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 36 इतकी होती. तर एकूण 1 हजार 710 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 929वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1 हजार 844 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण तसेच मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत चालले असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.


सद्यस्थितीत वयोगटानुसार कोरोना रुग्णांची आकडेवारी

1 वर्षाखालील - 66 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 2042 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 3871 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 29781 रुग्ण
51 ते 70 वर्ष -15898 रुग्ण
71 वर्षांवरील - 4025 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 55 हजार 683 रुग्ण झाले आहेत.

मागील तीन महिन्यात कोणत्या वयोगटामध्ये किती रुग्ण वाढले ?
(आकडेवारी 8 जानेवारी ते 15 एप्रिल या वेळेतील आहे)

मागील या तीन महिन्यात एकूण 6 हजार 70 रुग्ण वाढले आहेत. यामध्ये वयोगटानुसार विचार केल्यास 1 वर्षांखालील केवळ 9 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. 1 ते 10 वर्ष वयोगटातील 160 मुलांना, 11 ते 20 वयोगटातील 394 मुलांना, 21 ते 50 वयोगटात सर्वाधिक म्हणजेच 3 हजार 428 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 51 ते 70 वयोगटातील 1 हजार 662 आणि 71 वर्षांवरील 416 जणांना 8 जानेवारी 2021 ते 15 एप्रिल 2021 या कालावधीत कोरोनाची लागण झाली आहे. लहान मुलांना म्हणजेच 20 वर्षाखालील मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण राज्यात वाढले आहे. कोल्हापुरात तेच चित्र काही प्रमाणात दिलासादायक आहे. या तीन महिन्यात कोल्हापुरात 20 वर्षांखालील 563 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकंदरीत 21 ते 50 या वयोगटामध्येच कोल्हापूरात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.


तालुक्यानुसार रुग्णांची संख्या
1) आजरा - 985
2) भुदरगड - 1338
3) चंदगड - 1267
4) गडहिंग्लज - 1684
5) गगनबावडा - 161
6) हातकणंगले - 5652
7) कागल - 1775
8) करवीर - 6240
9) पन्हाळा - 2015
10) राधानगरी - 1331
11) शाहूवाडी - 1423
12) शिरोळ - 2648
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 8173
14) कोल्हापूर महानगरपालिका - 18074
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 2917

हेही वाचा-खळबळजनक! कोरोना संशयित रुग्ण आणि इतर रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार

ABOUT THE AUTHOR

...view details