कोल्हापूर- कोल्हापुरात आज आणखी 6 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात एकूण प्राप्त 140 अहवालांपैकी 135 अहवाल निगेटिव्ह तर 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र जिल्ह्यात 725 च्या पुढे एकही रुग्ण वाढलेला नाही. जिल्ह्यात आजअखेर 725 रुग्णांपैकी 650 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 67 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
कोल्हापुरात आज एकही नवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही; 6 रुग्णांची कोरोनावर मात - Kolhapur
जिल्ह्यात आजअखेर 725 रुग्णांपैकी 650 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 67 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
Corona kolhapur
आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे:
आजरा- 75, भुदरगड- 71, चंदगड- 75, गडहिंग्लज- 84, गगनबावडा- 6, हातकणंगले- 10, कागल- 57, करवीर- 21, पन्हाळा- 27, राधानगरी- 66, शाहुवाडी- 180, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-27 असे एकूण 717 आणि पुणे -1, सोलापूर- 3, मुंबई-1, कर्नाटक- 2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8, असे मिळून एकूण 725 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.