महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

क्वारंटाईन केलेल्या 5 जणांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला - corona news

क्वारंटाईन केलेल्या 5 नागरिकांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसल्याची घटना कोल्हापुरातील खिद्रापूर येथे घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पळून जाण्याचा प्रयत्न फसला.

kolhapur
क्वारंटाईन केलेल्या 5 जणांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

By

Published : Apr 24, 2020, 9:55 PM IST

कोल्हापूर - क्वारंटाईन केलेल्या 5 नागरिकांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसल्याची घटना कोल्हापुरातील खिद्रापूर येथे घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पळून जाण्याचा प्रयत्न फसला.

क्वारंटाईन केलेल्या 5 जणांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

कोल्हापुरातील खिद्रापूर मध्ये 5 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. तेथून त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. जवळपास 3 किलोमीटर पायी चालत गेले होते. मात्र, तेथून पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना पाहिले आणि पुन्हा क्वारंटाईन केले. आज दुपारी हा प्रकार खिद्रापूरमध्ये घडला. नागरिकांनी त्यांना का जात आहात असे विचारल्यानंतर घरची आठवण येत असल्याचे त्यांनी सांगितल्याचे समजले. त्या पाचही जणांची नावे अद्याप समजली नाहीत. मात्र, पळून जाताना पकडून त्यांना ग्रामस्थांनी पोलीस पाटील आणि सरपंच यांना याबाबत माहिती दिली. गेल्या एक महिन्यापासून गावात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. पण आज पहिल्यांदाच असा प्रकार घडला असल्याचे नागरिकांनी म्हटले.

क्वारंटाईन केलेल्या 5 जणांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details