कोल्हापूर - जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायतींसाठी वैध ठरलेल्या 15 हजार 417 अर्जांपैकी 7 हजार 40 उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले आहे. राहिलेल्या 8 हजार 377 पैकी 720 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात 7 हजार 657 उमेदवारांमध्ये चुरस असणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील एकूण 433 पैकी 47 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. अखेरच्या दिवशी किती जण आपला अर्ज माघार घेणार, याकडे लक्ष्य होते. सोमवारी उशिरा रात्री जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक : कोल्हापूर जिल्ह्यात 7 हजार 657 उमेदवारांमध्ये चुरस - kolhapur gram panchayat election news
कोल्हापूर जिल्ह्यातील 433 पैकी 47 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहे. तर राहिलेल्या ग्रामपंचायतीमध्ये 7 हजार 657 उमेदवारांमध्ये चुरस आहे.
![ग्रामपंचायत निवडणूक : कोल्हापूर जिल्ह्यात 7 हजार 657 उमेदवारांमध्ये चुरस 47 Gram Panchayat unopposed in kolhapur district](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10121151-93-10121151-1609809925116.jpg)
ग्रामपंचायत निवडणूक : कोल्हापूर जिल्ह्यात 7 हजार 657 उमेदवारांमध्ये चुरस
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावागावांत चुरशीने आणि ईर्ष्येने 15 हजार 417 अर्ज दाखल झाले. वैध ठरलेल्या अर्जांपैकी दुबार तसेच डमी म्हणून नातेवाईकांचे भरलेले 7 हजार 40 अर्ज माघारी घेतले गेले आहेत. माघारीसाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचाही अवलंब अनेक ठिकाणी केला जात होता. एकमेकाला अडचणीच्या ठरणार्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. गटा-तटाच्या नेत्यांसह काही ठिकाणी जिल्हास्तरावरील नेत्यांचीही फोनाफोनी सुरू होती. काहींची विनवणी केली जात होती, तर रात्रभर अनेक गावांत माघारीसाठी नेते, कार्यकर्ते प्रयत्नात होते. त्यामध्ये काही प्रमाणात यश आले असून जिल्ह्यातील एकूण 720 सदस्य बिनविरोध निवडणून आले आहेत. तर 47 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.