कोल्हापूर - इचंलकरंजी येथील ४ वर्षीय बालकाने कोरोनावर मात केली आहे. आज दुपारी त्या बालकाचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून तो कोरोनामुक्त झाला आहे. या बाळाला लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असून दक्षता म्हणून सीपीआर रुग्णालयात ठेवले आहे.
दिलासादायक! इचलकरंजीमधील ४ वर्षीय बालकाची कोरोनावर मात - कोल्हापूर कोरोना पॉझिटिव्ह
आजोबांच्या संपर्कात आल्याने ४ वर्षीय बालकाला कोरोनाची लागण झाली होती. चार दिवसांपूर्वी त्याच्या आजोबांचा मृत्यू झाला. मात्र, नातवाने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे परिसरात दिलासादायक वातावरण आहे.
आजोबांच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली होती. चार दिवसांपूर्वी त्याच्या आजोबांचा मृत्यू झाला. मात्र, नातवाने कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे परिसरात दिलासादायक वातावरण आहे. कोरोना झालेल्या लहान बाळांवर उपचार करताना अनेक अडचणी येत असतात. मात्र, या सर्वांमधून या बालकाने कोरोनावर मात केली आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, कोल्हापुरात आत्तापर्यंत एकूण 14 कोरोनाबधित रुग्ण आढळले. त्यातील 6 जण कोरोनामुक्त झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच 7 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत.