महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 7, 2020, 12:00 AM IST

ETV Bharat / state

कोल्हापूर: 23 गावांमधील 1 हजार 750 कुटुंबातील 4 हजार 413 व्यक्तींचे स्थलांतर

जिल्ह्यातल्या 23 गावांमधील 1 हजार 750 कुटुंबातील 4 हजार 413 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत माहिती दिली.

kolhapur flood
सामानासह आपले घर सोडून जाताना नागरिक

कोल्हापूर- जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी नदीकाठच्या गावांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले होते. गतवर्षीच्या महाप्रलयात जिल्ह्यातील अनेक गावांमधील नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढावे लागले होते. हीच वेळ पुन्हा येऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने आधीपासूनच खबरदारी घेतली आहे. त्यानुसार जिल्ह्यातल्या 23 गावांमधील 1 हजार 750 कुटुंबातील 4 हजार 413 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत माहिती दिली.

सामानासह आपले घर सोडून जाताना नागरिक

स्थलांतरीत कुटुंबांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे:

गडहिंग्लज तालुका: 2 बाधित गावांमधील 5 कुटुंबातील 21 व्यक्तींसह 14 जनावरांचे स्थलांतरण.

पन्हाळा तालुका: 2 बाधित गावांमधील 3 कुटुंबातील 14 व्यक्तींसह एका जनावराचे स्थलांतरण.

करवीर तालुका: 3 बाधित गावांमधील 1 हजार 603 कुटुंबातील 3 हजार 850 व्यक्तींसह 1 हजार 38 जनावरांचे स्थलांतरण. यामध्ये चिखली आणि आंबेवाडी या 2 गावातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

गगनबावडा तालुका: 8 बाधित गावांमधील 21 कुटुंबातील 68 व्यक्तींचे स्थलांतरण.

आजरा तालुका: सुळेरान गावातील एका कुटुंबातील 9 व्यक्तींचे स्थलांतरण.

चंदगड तालुका: 6 बाधित गावांमधील 97 कुटुंबातील 377 व्यक्तींसह 47 जनावरांचे स्थलांतरण.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 20 कुटुंबातील 74 नागरिकांना दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. अशा जिल्ह्यातील एकूण 23 गावांमधील 1 हजार 750 कुटुंबातील 4413 व्यक्तींना आणि 1 हजार 100 जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

हेही वाचा-कोल्हापुरात 'महापूर', 'मच्छिंद्री' झाली; लवकरच शहरात पाणी घुसण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details