महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 8, 2020, 9:15 PM IST

ETV Bharat / state

कोल्हापुरात आज 17 रुग्णांना डिस्चार्ज, तर आणखी 4 कोरोनाचे रुग्ण वाढले

आज एकूण वाढलेल्या 4 रुग्णांसहित एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 684 वर पोहोचली आहे तर त्यातील एकूण 472 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 8 जणांचा कोल्हापुरात कोरोनाने मृत्यू झाला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

कोल्हापूर- कोल्हापुरात आज सकाळपासून आणखी 17 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आणखी 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापुरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण बरे होतानाचे चित्र पाहायला मिळत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र काल शहरातील एका डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली त्यानंतर त्यांच्या रुग्णालयातील एका कर्मचारी महिलेला सुद्धा लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर मात्र कोल्हापुरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या 2 महिन्यांपासून कोल्हापूर शहरात 20 पेक्षा जास्त रुग्णांची संख्या झाली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला मोठे यश आले होते, मात्र डॉक्टरालाच आता लागण झाली आणि त्यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्याला, त्यामुळे आता कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

शहरात आज दिवसभरात 2 रुग्णांची वाढ झाली आहे. तर भुदरगड आणि कागल तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्णाची वाढ झाली आहे. आज एकूण वाढलेल्या 4 रुग्णांसहित एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 684 वर पोहोचली आहे तर त्यातील एकूण 472 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 8 जणांचा कोल्हापुरात कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अद्याप 203 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजअखेर तालुका, नगरपालिका आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे

आजरा- 72

भुदरगड- 68

चंदगड- 72

गडहिंग्लज- 77

गगनबावडा- 6

हातकणंगले- 7

कागल- 56

करवीर- 14

पन्हाळा- 25

राधानगरी- 63

शाहूवाडी- 174

शिरोळ- 7

नगरपरिषद क्षेत्र- 11

कोल्हापूर महापालिका क्षेत्र-24

असे एकूण 676 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2, आंध्रप्रदेश-1 आणि मुंबई-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 684 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details