कोल्हापूर- जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली. आज दिवसभरात 311 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 77 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1965 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 54 हजार 28 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे एकूण ऍक्टिव्ह 1 हजार 965 रुग्णांपैकी ग्रामीण आणि नगरपालिका क्षेत्रात 752 रुग्ण घरातून उपचार घेत आहेत तर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात 378 रुग्ण घरातून उपचार घेत आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर
कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 54 हजार 28 वर पोहोचली आहे. त्यातील 50 हजार 257 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1965 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1806 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.
हेही वाचा -रेमडेसीवीरचा काळाबाजार केल्याप्रकरणी चौघांना अटक; पुण्यात इंजेक्शनची रिटेल विक्री बंद
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे