कोल्हापूर- ऐन 31 डिसेंबर दिवशीच कोल्हापुरात मटणाचा प्रश्न पेटला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि महानगरपालिकेकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत मटण विक्रेत्यांनी आज मटण विक्री थांबवली आहे.
तांबडा-पांढऱ्या रश्श्याशिवाय कोल्हापूरकरांचा थर्टी फर्स्ट साजरा होतच नाही. त्यामुळे ऐन 31 डिसेंबरच्या दिवशीच कोल्हापुरात मटण विक्री होत नसून, त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली आहे. तसेच सुडबुद्धीने प्रशासन कारवाई करत असल्याचा आरोप मटण विक्रेत्यांनी केला आहे.
दरम्यान, आजचा दिवस नियम बाजूला ठेवा आणि मटण विक्री करा, अशा प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत. चार दिवसांपूर्वी विक्रीचे निकष न पाळल्याने एका मटण दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करून दुकान बंद करण्याचे आदेश दिले होते.