लॉकडाऊननंतरही कोल्हापुरात रुग्णसंख्येत मोठी वाढ - kolhapur corona updates
कडक लॉकडाऊन केल्यानंतरही कोल्हापुरातील रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. गेल्या चोवीस तासात 2599 नवीन रुग्ण आढळले आहेत तर 45 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये आठ दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. किराणा आणि भाजीपाला सुद्धा बंद ठेवून केवळ घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली होती. कडक लॉकडाऊन केल्यानंतरही कोल्हापुरातील रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. गेल्या चोवीस तासात 2599 नवीन रुग्ण आढळले आहेत तर 45 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे दिवसभरात 1 हजार 622 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 14 हजार 189वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 94 वर पोहोचली आहे. त्यातील 85 हजार 612 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 189 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 3 हजार 494 झाली आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील - 164 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 3689 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 7694 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 58147 रुग्ण
51 ते 70 वर्ष -26664 रुग्ण
71 वर्षांवरील - 6936 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 1 लाख 3 हजार 294 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार नवीन रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 41
2) भुदरगड - 65
3) चंदगड - 39
4) गडहिंग्लज - 26
5) गगनबावडा - 25
6) हातकणंगले - 363
7) कागल - 101
8) करवीर - 358
9) पन्हाळा - 135
10) राधानगरी - 53
11) शाहूवाडी - 45
12) शिरोळ - 264
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 270
14) कोल्हापुर महानगरपालिका - 647
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 167