कोल्हापूर - दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 963 वर पोहोचली आहे. त्यातील 743 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 13 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात 207 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण संख्या 207 वर; आतापर्यंत कोरोनाने 13 जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 963 वर पोहोचली आहे. त्यातील 743 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 13 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात 207 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत 400 प्राप्त अहवालापैकी 364 अहवाल निगेटिव्ह तर 22 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी पाठविण्यात आलेले 6 अहवाल पॉझिटिव्ह, 5 अहवाल प्रलंबित, तर 3 अहवाल नाकारण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. 22 पॉझिटिव्ह अहवालापैकी चंदगड तालुक्यातील 6 रुग्ण, गडहिंग्लजमधील 1, हातकणंगले 1, करवीर 1, राधानगरी 2, शिरोळ 2 आणि नगरपरिषद क्षेत्रातील 9 जणांचा समावेश आहे.
तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा - 87, भुदरगड - 76, चंदगड - 111, गडहिंग्लज - 110, गगनबावडा - 7, हातकणंगले - 18, कागल - 58, करवीर - 30, पन्हाळा - 29, राधानगरी - 73, शाहूवाडी - 187, शिरोळ - 12, नगरपरिषद क्षेत्र - 86, कोल्हापूर महापालिका क्षेत्र -59 तर पुणे - 2, सातारा- 2, सोलापूर - 3, मुंबई - 4, नाशिक - 1, कर्नाटक - 7 आणि आंध्रप्रदेश - 1 असे इतर जिल्हा व राज्यातून आलेले 20 जण मिळून एकूण 963 रुग्ण संख्या जिल्ह्यात आहे.