महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Artists Tribute To Shahu Maharaj : कोल्हापुरात देशातील विविध कलाकार वाहणार लोकराजाला आदरांजली! - विविध कलाकार वाहणार लोकराजाला आदरांजली

लोकराजा छत्रपती शाहू महाराज ( Chhatrapati Shahu Maharaj ) कृतज्ञता पर्वानिमित्त तसेच छत्रपती संभाजी महाराज ( Chhatrapati Sambhaji Maharaj ) यांना 200 कलाकार आदरांजली ( 200 artists Tribute ) वाहणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी म्हणजेच दिनांक 14 मे रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शाहू महाराज तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री ( Chhatrapati Shahu Maharaj and Guardian Minister Satej Patil ) सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.

सराव करताना कलाकार
सराव करताना कलाकार

By

Published : May 13, 2022, 4:44 PM IST

Updated : May 13, 2022, 5:54 PM IST

कोल्हापूर -लोकराजा छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक १४ व १५ मे रोजी तब्बल 10 ते 12 राज्यातील 200 कलाकार एकत्र येऊन आपली कला सादर करत लोकराजाला मानवंदना देणार आहेत. आजादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर व कोल्हापूर जिल्हा प्रशासन ( Cultural Center Nagpur and Kolhapur District Administration ) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी म्हणजेच दिनांक 14 मे रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शाहू महाराज तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री ( Chhatrapati Shahu Maharaj and Guardian Minister Satej Patil ) सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

कलाकारांची जोरदार तयारी :राजश्री शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या लोककलेतून आदरांजली वाहण्यासाठी तब्बल दहा ते बारा राज्यातील कलाकार कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत. हे सर्व कलाकार शाहू मिल येथे सध्या जोरदार तयारी करताना पहायला मिळत आहे. या कार्यक्रमामध्ये विविध राज्यातील पारंपरिक व लोकनृत्य सादर होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील पोवाडा, धनगरी गजा, सोंगी मुखवटे व लावणी तर मध्य प्रदेशमधील गुदूम बाजा, छत्तीसगड येथील पंथी नृत्य, पंजाबमधील भांगडा नृत्य, काश्मीर येथील रोफ नृत्य, गुजरातमधील सिटूरी धमाल, आसाम येथील बिहू नृत्य, हरियाणामधील घूमर व कर्नाटक येथील हालाकी सुग्गी कुनिथा था नृत्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तब्बल दोनशे लोक कलाकार सहभागी झाले असून या संपूर्ण कार्यक्रमाची कोरिओग्राफी हे मुंबईचे सुप्रसिद्ध कोरिओग्राफर अरविंद राजपूत हे करत आहेत. यामुळे येत्या 14 व 15 मे रोजी कोल्हापूरकरांना देशातील विविध राज्यातील लोककला पहावयास मिळणार आहे.

हेही वाचा -विधवा वहिणीला सौभाग्याचं कुंकू लावत दीरानं स्वीकारले अडीच वर्षाच्या मुलाचं पितृत्व

Last Updated : May 13, 2022, 5:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details