महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीपीआर रुग्णालयामधील 20 हजार लिटरचा ऑक्सिजन टँक झाला कार्यान्वित

कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनचा विचार करून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय(सीपीआर)मध्ये 20 हजार लिटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टँक बसवण्यात आला आहे. यातील 1 लीटर द्रवापासून 850 लीटर वायूरुप ऑक्सिजन मिळणार आहे.

CPR Hospital
सीपीआर रुग्णालय

By

Published : Aug 26, 2020, 1:25 PM IST

कोल्हापूर -जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनचा विचार करून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय(सीपीआर)मध्ये 20 हजार लिटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टँक बसवण्यात आला आहे. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी निर्णय घेवून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या ऑक्सिजन टँक खरेदीला मंजुरी दिली होती.

आजपासून हा टँक कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसाला 275 रुग्णांच्या ऑक्सिजनची सोय झाली असून आणखी 125 रुग्णांसाठी पुरवठा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. 30 फूट उंच, 2 मीटर व्यास असलेला हा लिक्विड टँक आहे. यासोबतच 400 क्युबिक मीटर प्रतीतास क्षमतेचा वेपोरायझरही बसवण्यात आला आहे. 20 हजार लीटर क्षमतेचा हा टँक असून यातील 1 लीटर द्रवापासून 850 लीटर वायूरुप ऑक्सिजन मिळणार आहे. या टँकमधून सीपीआरमध्ये 17 ठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटापर्यंत ऑक्सिजन सुविधा देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चेन्नई येथील व्हीआरव्ही एशिया पॅसिफिक प्रायव्हेट लिमीटेड कंपनीशी संपर्क साधून हा टँक मागवला आहे. हा टँक बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, शाखा अभियंता अविनाश पोळ, कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गाडवे, तांत्रिक व्यवस्थापक रवींद्र देसाई, संजय दिंडे, अभियंता सुजित प्रभावळे, मेंटनन्स हेड शैलेश धुळशेट्टी, लगमा मधिहाळ, प्रदिप भोपळे यांनी परिश्रम घेतले. आज वैद्यकीय अधीष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी भेट देवून याची पाहणी केली. यावेळी डॉ. उल्हास मिसाळ आणि बायोमेडिकल अभियंता वैजनाथ कापरे हे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details