मुंबई -केंद्र सरकारने १ मे ते २७ मे २०२० पर्यंत देशातील वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या परप्रांतीय नागरिकांसाठी भारतीय रेल्वेच्या 'श्रमिक स्पेशल' गाड्याच्या ३५४३ फेऱ्या केल्या. या माध्यमातून महाराष्ट्रासह इतर राज्यातील ४८ लाख श्रमिक प्रवाशांना त्यांच्या स्वराज्यात पोहोचवले.
केंद्र सरकारने केलेली व्यवस्था
रेल्वने गुजरात-९४६, महाराष्ट्र-६७७, पंजाब-३७७, उत्तर प्रदेश-२४३, आणि बिहार-२१५ श्रमिक स्पेशल ट्रेनस चालविल्या आहेत. यावेळी २२५ रेल्वेतील ७८ लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था फ्रिमध्ये करण्यात आली. तसेच १.१० कोटी पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आले.
विशेष श्रमिक रेल्वे या नियमित रेल्वे नव्हेत; आवश्यकतेनुसार त्यांच्या मार्गात बदल - यादव
कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी सुरू झालेल्या रेल्वे भलतीकडेच जात असल्याचा आरोप होत आहे. त्यावर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी शुक्रवारी स्पष्टीकरण दिले. आतापर्यंत सोडण्यात आलेल्या 3 हजार 840 विशेष श्रमिक रेल्वे गाड्यांपैकी केवळ 4 गाड्यांनी इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी 72 तासांहून अधिक वेळ घेतल्याचे ते म्हणाले. 20 ते 24 मेदरम्यान काही मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे केवळ 1.85% रेल्वे गाड्या दुसरीकडे वळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकृत माहितीनुसार, 36.5% विशेष श्रमिक रेल्वे गाड्या बिहारला, 42.2% उत्तर प्रदेशला पाठवण्यात आल्या. यामुळे या मार्गांवर मोठा ताण पडला. आतापर्यंत 52 लाख प्रवाशांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. मागील आठवड्यात 1 हजार 524 रेल्वेंच्या माध्यमातून 20 लाख प्रवाशांना सोडले आहे. आता विशेष श्रमिक रेल्वेंची मागणी कमी होत असल्याचे यादव म्हणाले. सध्या आमच्याकडे 449 रेल्वेंची मागणी आली आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकारने केलेली व्यवस्था
लॉकडाऊनमुळे परराज्यातील अडकलेल्या स्थलांतरीत मजूर, प्रवासी, भक्त आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारच्या समन्वायने श्रमिक विशेष रेल्वेची सोय केली आहे. या रेल्वेमुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महत्वाच्या रेल्वे स्थानकातून नियोजन करुन लाखो मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविले आहे. 5 ते 23 मे दरम्यान 481 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. या व्यवस्थेवर 85 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या माध्यमातून आतापर्यंत 6 ते 7 लाख मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या 32 हजार फेऱ्या झाल्या असून 3 लाख 80 हजार जणांना सोडण्यात आले आहे. यात देखील 75 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी २४ मे रोजी फेसबुक लाईव्हद्वारे दिली.
३० मे रोजी श्रमिक विशेष रेल्वेने नांदेड येथून १४२० प्रवासी पश्चिम बंगालकडे रवाना..!
कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात व शेजारील जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या १ हजार ४२० प्रवाशांना घेवून आज नांदेड येथून विशेष श्रमिक रेल्वेने पश्चिम बंगालकडे रवाना झाली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकून पडलेल्या प्रवासी, यात्रेकरु, विद्यार्थी, मजूर यांना त्यांच्या मुळगावी परतता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करुन प्रत्येक तालुक्यातून प्रवाशांना एकत्र करण्यात आले
कोकण रेल्वेने आज २९ मेपर्यंत ६८ हजार ७५९ कामगारांना पोहोचवले घरी
रत्नागिरीतून लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात कोकण रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करून महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यानंतर कोकण रेल्वेने गेल्या २० दिवसात ५१ विशेष श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून तब्बल ६८ हजार ७५९ कामगारांना देशाच्या विविध भागात पोहोचवले आहे. या वीस दिवसात महाराष्ट्रातून १३ ट्रेनच्या माध्यमातून १५ हजार ६७७ परप्रांतीय कामगार आणि कुटुंबीयांना विविध राज्यात पोहोचवण्याचे काम कोकण रेल्वेने केले आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातून ८ तासांत ३ श्रमिक ट्रेन रवाना; उत्तर प्रदेशचे कामगार रवाना
कल्याण रेल्वे स्थानकातून उत्तरप्रदेशाला जाणाऱ्या मजुरांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आठ तासांत तीन श्रमिक ट्रेन रवाना करण्यात आल्या आहेत. यामधील पहिली कल्याण ते भदोही (उ. प्र.) ही श्रमिक ट्रेन काल सायंकाळी ४ वाजता रवाना करण्यात आली होती. या श्रमिक ट्रेनमधून १७८८ मजूर रवाना झाले आहेत. त्या पाठोपाठ कल्याण ते जौनपूर (उ.प्र.) ही दुसरी श्रमिक ट्रेन सायंकाळी ६ वाजून १० मिनिटाने रवाना करण्यात आली आहे. या श्रमिक ट्रेन मध्ये १६५० प्रवासी होते. तर तिसरी श्रमिक ट्रेन कल्याण ते गोरखपूरसाठी (उ. प्र.) रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी रवाना झाली. यातून १८५२ प्रवासी माघारी गेले. काल दिवसभरात ५ हजार २९० प्रवाशांना आपापल्या राज्यात सोडण्यात आले आहे. दरम्यान, काल दुपारी उत्तर प्रदेशला जाणारी श्रमिक ट्रेन उशिरा धावल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. मात्र काही वेळातच पोलिसांनी या प्रवाशांची व्यवस्था कल्याण आणि विठ्ठलवाडी बस डेपोत केल्याने संभ्रम कमी झाला.
२८ मे - नंदुरबारमधून दीड हजार परप्रांतीय मजूर, विद्यार्थी श्रमिक एक्स्प्रेसने गावाकडे रवाना
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या श्रमीक एक्स्प्रेसने त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले. जामिरा संकुल येथील 1518 विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील अन्य 70 मजूर अशा 1588 प्रवाशांना विशेष श्रमीक एक्स्प्रेसने झारखंड, बंगाल व आसामला पाठविण्यात आले.
साईनगर शिर्डी येथून श्रमिक रेल्वेने 1 हजार 104 कामगार व कुटुंबिय बिहारकडे रवाना.
शिर्डी(अहमदनगर)- कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले. लॉकडाऊनमुळे बिहार राज्यातील कामगार जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकून पडले होते. राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि कोपरगांव तालुक्यातील 1 हजार 104 कामगार व त्यांचे कुटुंबिय शुक्रवारी साईनगर शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने बिहारकडे रवाना झाले.यामध्ये राहाता व पिंप्री निर्मळ येथे शिक्षण घेणाऱ्या 86 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
सिंधुदुर्गमधून झारखंडचे 1545 नागरिक श्रमिक रेल्वेने झाले रवाना
सिंधुदुर्गमध्येलॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडण्याकरता सरकारने श्रमिक रेल्वे आणि बसेसची व्यवस्था केली. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून आज २४ मेपर्यंत सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकातून झारखंड राज्यातील हातिया स्थानकाकडे विशेष श्रमिक विशेष रेल्वे रवाना करण्यात आली. जिल्ह्यातून सोडण्यात आलेल्या या चौथ्या श्रमिक रेल्वेतून 1 हजार 545 कामगार झारखंडकडे रवाना झाले.
संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून मजूर व कामगार यांना एस.टी. बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. त्यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील 237 मजूर हे 12 बसमधून, मालवण येथील 491 मजूर हे 25 बसमधून, कुडाळमधील 372 मजूर हे 22 बसमधून, सावंतवाडी येथील 384 मजूर हे 19 बसधून, देवगडमधील 37 मजूर हे 2 बसेसमधून आणि वैभववाडी तालुक्यातील 24 जण एका बसमधून असे एकूण 81 बसमधून 1 हजार 545 मजूर सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले.
बिहारी कामगारांना घेऊन जाणारी रेल्वे निम्मी रिकामीच
परराज्यातील कामगारांना सोडण्यासाठी जालना जिल्ह्यातून आज बिहारकडे तिसरी श्रमिक रेल्वे रवाना झाली. शासन दरबारी एकूण तीन हजार आठ बिहारी नागरिकांची नोंद होती. त्यापैकी 1, 608 कामगार या रेल्वेने जाऊ शकतील, असे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र प्रत्यक्षात रेल्वे 859 म्हणजेच अर्धीच रेल्वे बिहारी कामगारांना घेऊन रवाना झाली आहे.
पुण्यात अडकलेले विद्यार्थी आणि नागरिक विशेष रेल्वेने जम्मू काश्मीरला रवाना