कोल्हापूर- कोरोनाचा विळखा राज्यात झपाट्याने वाढत आहे. कोल्हापुरात आतापर्यंत 1 हजार 189 जणांनी स्क्रीनिंग करुन घेतले आहे. यामध्ये घरी अलगीकरण करण्यात आलेल्यांपैकी 194 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नसून ही चांगली गोष्ट असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटले आहे.
कोल्हापुरातील 194 जण 'निगेटिव्ह'...14 दिवसांचा कालावधी पूर्ण - कोल्हापूर कोरोना बातमी
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र येत्या 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली. मात्र, त्यानंतरतही लोकांनी गंभीरता लक्षात घेतलेली दिसत नाही. त्यामुळे सोमवारी राज्यात संचारबंदी लावण्यात आली असून सर्व जिल्ह्यांच्या सीमाही सील केल्या आहेत.
हेही वाचा-CORONA VIRUS : राज्यात संचारबंदी.. आता जिल्ह्यांच्या सीमाही बंद - मुख्यमंत्री
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र येत्या 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली. मात्र, त्यानंतरतही लोकांनी गंभीरता लक्षात घेतलेली दिसत नाही. त्यामुळे सोमवारी राज्यात संचारबंदी लावण्यात आली असून सर्व जिल्ह्यांच्या सीमाही सील केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये त्याची कडक अंमलबजावणी करा, असे आदेश सुद्धा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे पुणे, मुंबईहून आलेल्या प्रवाशांनी सीपीआरमध्ये तपासणी करुन घ्यावी असेही त्यांनी म्हंटले आहे.