कोल्हापूर - जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात एकूण 17 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. शनिवार सायंकाळी 5 वाजता 829 प्राप्त अहवालांपैकी 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, 811 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामधील 1 अहवाल नाकारण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारअखेर जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 278 वर जाऊन पोहोचली आहे. 278 पैकी सर्वाधिक रुग्ण शाहूवाडी तालुक्यात आढळले आहेत. एकट्या शाहुवाडीत तब्बल 89 रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात शनिवारी 17 कोरोनाबाधितांची नोंद, आकडा 278 वर; शाहूवाडीत सर्वाधिक 89 - kolhapur corona news
शनिवार सायंकाळी 5 वाजता 829 प्राप्त अहवालांपैकी 17 अहवाल पॉझिटिव्ह तर, 811 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यातील 1 अहवाल नाकारण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारअखेर जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या 278 वर जाऊन पोहोचली आहे. 278 पैकी सर्वाधिक 89 रुग्ण हे शाहूवाडीत आढळले आहेत.
![जिल्ह्यात शनिवारी 17 कोरोनाबाधितांची नोंद, आकडा 278 वर; शाहूवाडीत सर्वाधिक 89 जिल्ह्यात एकूण पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या 278 वर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7323586-791-7323586-1590287206587.jpg)
शनिवारी दिवसभरात आलेल्या 17 पॉझिटिव्ह अहवालामध्ये :
आजरा-2
भुदरगड-8
शाहूवाडी-7 असा समावेश आहे.
शनिवारअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
आजरा- 15
भुदरगड- 32
चंदगड- 18
गडहिंग्लज- 13
गगनबावडा- 5
हातकणंगले- 3
कागल- 1
करवीर- 10
पन्हाळा- 15
राधानगरी- 42
शाहूवाडी- 89
शिरोळ- 5
नगरपरिषद क्षेत्र- 10
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-16 असे एकूण 274
पुणे -1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण रुग्णांची संख्या 278 वर
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
1 वर्षांखालील : 0
1 ते 10 वर्ष : 24
11 ते 20 वर्ष : 38
21 ते 50 वर्ष : 193
51 ते 70 वर्ष : 22
71 वर्षांवरील : 1
शनिवार दिवसभरात आणखी 229 जणांचे स्वॅब चाचणी चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.