कोल्हापूर - पुराच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाली. त्यामुळे सातारा-कागलपर्यंत बंद असलेला राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ४ वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे शहारामध्ये २ लाख ७० हजार लिटर पेट्रोल, २ लाख ४० हजार लिटर डिझेल, तर १४ हजार गॅस सिलेंडर दाखल झाले आहेत. त्यासाठी नागरिकांच्या ५०० ते ६०० मीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोल्हापुरात पेट्रोल, डिझेलसह १४ हजार गॅस सिलेंडर दाखल; नागरिकांच्या अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा - राष्ट्रीय महामार्ग
गेल्या २ दिवसांपासून हळूहळू पाणीपातळी कमी होत गेली. सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गवर एका बाजूने वाहतूक सुरू होती. दुपारनंतर दुसऱ्या बाजूने देखील वाहतूक सुरू करण्यात आली. महामार्ग खुला झाल्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, पाण्याचे टँकर शहरामध्ये दाखल झाले आहेत.
२ ऑगस्टपासून कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापुराने थैमान घातले होते. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. दोन्ही जिल्ह्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता. राष्ट्रीय महामार्ग देखील पाण्यात गेल्याने कोल्हापूरचा मुंबई, पुण्याशी संपर्क तुटला होता. गेल्या २ दिवसांपासून हळूहळू पाणीपातळी कमी होत गेली. सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गवर एका बाजूने वाहतूक सुरू होती. दुपारनंतर दुसऱ्या बाजूने देखील वाहतूक सुरू करण्यात आली. महामार्ग खुला झाल्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, पाण्याचे टँकर शहरामध्ये दाखल झाले. त्यामुळे आता पूरपरिस्थितीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.