कोल्हापूर -कोल्हापुरातील कोरोना रुग्णांचा बरे होण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक (91 टक्क्यांहून अधिक) आहे. मात्र, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज दिवसभरात कोरोनाचे पाच रूग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
कोल्हापुरात कोरोनाचा दहावा बळी; तर दिवसभरात आणखी ५ रुग्ण वाढले
कोल्हापूरात आज दिवसभरात कोरोनाचे पाच रूग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात कोरोनाचा बळी गेला नव्हता. मात्र, आज एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचा आज दहावा बळी गेला.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात कोरोनाचा बळी गेला नव्हता. मात्र, आज एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचा आज दहावा बळी गेला. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज रात्री 9 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत आणखी 5 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील 4 रुग्णांचा समावेश आहे. एकाच वेळी 4 रूग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.
आज सकाळपासून एकूण 182 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 176 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एक अहवाल पुन्हा पाठवण्यात आला आहे. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये कोल्हापूर शहरातील 4 आणि चंदगड तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आत्तापर्यंत 770 रुग्णांपैकी 710 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दहा जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 50 झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात एकाही रुग्णाला डिस्चार्ज दिला नाही.